712 : देशभरात खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात, पेरणी क्षेत्रात घट
देशातील बहुतेक भागात खरीपाची पेरणी अंतिम टप्प्यात आलीये. भात, मूग, उडीद अशा पिकांच्या पेरण्या जवळपास पूर्ण होत आल्यात. मात्र पावसाचा खंड पडल्यानं बऱ्याच भागात अजुनही पेरण्या झालेल्या नाही. यंदा पेरणी झालेल्या क्षेत्राच्या आकडेवारीतही घट झाल्याचं दिसून येतंय.