712 | कारल्यासारख्या वेलवर्गीय पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
खरिपात अन्नधान्य पिकांसोबतच भाजीपाला पिकांचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या ही पिकं फुलोरा ते फळधारणेच्या अवस्थेत आहे. त्यातही वेलवर्गीय भाजीपाला पिकं काही दिवसात काढणीसाठी तयार होतील. जळगावमध्ये वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे कारल्या सारख्या वेलवर्गीय पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून आलाय.