712 : इंदापूर :दूध आणि भाजीपाल्याच्या भावासाठी कायद्याचा विचार- राजू शेट्टी
काही पिकांना केंद्र सरकार हमी भाव जाहीर करतं पण दूध, भाजीपाल्यासारखी पिकं यापासून वंचित राहतात. या शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी कायदा गरजेचा आहे तसंच हमी भावापेक्षा कमीने खरेदी करणारांना शिक्षेची तरतूदही हवी, या गोष्टींसाठी विधेयकाच मसुदा खासदार राजू शेट्टी लोकसभेत मांडणार आहेत. त्याबाबतची माहिती त्यांनी इंदापुरच्या भवानीनगर इथे एका कार्यक्रमात दिली