712 | केंद्राच्या पथकाकडून राज्यातील दुष्काळी भागांची पाहणी
दुष्काळी भागांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी राज्यात आले आहेत. मराठवाड्यापासून त्यांनी या पाहणीला सुरुवात केली. परभणीमधील सेलू, मानवत या तालुक्यांमध्ये त्यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी संवाद साधत तिथली परिस्थितीही जाणून घेतली. परभणीप्रमाणेच एक पथक मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांमध्येही दाखल झालं. सांगलीतील आटपाडीमध्ये, धुळ्यातील लळींगमध्ये, तर जळगावमध्ये जामनेर तालुक्यातील गावांमध्ये केंद्राच्या पथकाने पाहणी केली. कापूस, तूर अशा पिकांची अवस्था, जनावरांसाठी असलेल्या चाऱ्याची परिस्थिती आणि गावातील पाण्याचा साठा यांची पाहणी त्यांनी केली. या पथकाच्या पाहणी अहवालावरच राज्याला मिळणारी दुष्काळी मदत निश्चित होणार आहे.