712 मुंबई: मंत्रिमंडळ बैठकीत बांबू लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यामध्ये राज्यातील बांबूचं लागवड क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. राज्यातील बाबूंचं लागवड क्षेत्र आणि संबंधित उद्योग वाढवण्यासाठी बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान या कंपनीच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारनेही बांबूच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय बांबू मिशनची घोषणा केली होती. अर्थ संकल्पात मोठा निधीही या मिशनसाठी देण्यात आला. आता राज्य मंत्रीमंडळाच्या या निर्णयामुळे बांबूच्या क्षेत्राच्या विस्ताराला चालना मिळणारेय.