712 बारामती: दुधाला भाव मिळणार कधी?
शेतकऱ्यांनी आंदोलनं करायची, सरकारने घोषणा करायची त्यानंतर अंमलबजावणीला वेळ लावायचा असं चक्र सुरु असतं. त्याचाच प्रत्यय दूध उत्पादक शेतकरी घेत आहेत.आधी २१ जुलैपासून २५ रुपये दर मिळेल असं सरकारने सांगितलं मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याला २० रुपयाच्या वर दर मिळाला नाही, पुन्हा त्या संबंधिचा जीआरही काढला, त्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ ऑगस्टला बारामतीत काय चित्र होतं?