एक हजार बेडवर मशरुमचं उत्पादन | 712 | अमरावती | एबीपी माझा
शिक्षण झाल्यानंतर बहुतेक तरुण नोकरीच्या मागे लागतात. मात्र अमरावतीतील या तरुणांनी स्वतःचा शेतीपुरक व्यवसाय सुरु केला. आणि त्यातून नोकरीतील पगारापेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं. ही कथा आहे स्वप्नील डवरे, रत्नदीप घोगरे आणि निखील गायकवाड यांची. घरातील गाय़ीच्या गोठ्यात मशरुम शेती करत त्यांनी ही प्रगती साधलीये.