बीड : सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची संकल्पना आणि वन विभागाच्या सहकार्याने होत असलेल्या पहिल्या वृक्ष संमेलनाची सुरुवात आज वृक्षदिंडीने झाली. या वृक्ष दिंडीत सयाजी शिंदे यांच्यासह राज्यभरातील पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, वृक्ष प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 13 व 14 फेब्रुवारीला पालवनच्या देवराई प्रकल्पावर पहिले वृक्ष संमेलन होत आहे. या निमित्ताने अनोखे असे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम होणार आहेत.


दोन दिवस चालणाऱ्या या वृक्ष संमेलनाच्या दिवशी आज वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्ष दिंडीत सजवलेल्या रथातून वृक्षांची मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या पुतळ्यापासून दिंडीला सुरुवात झाली. या वृक्षदिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षा संदर्भातल्या घोषणा देत वेगवेगळ्या कलाकृती सादर केल्या. या दिंडीचा समारोप सामाजिक न्याय भवन परिसरात करण्यात आला.



(छायाचित्र - अनिल धायगुडे)

सह्याद्री देवराई प्रकल्पावर पहिले वृक्ष संमेलन -
पर्यावरण आणि निसर्गप्रेमी असेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत हे संमेलन होत असून पालकमंत्री धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण प्रेमींसाठी अनोखी मेजवाणी असलेल्या या वृक्ष सम्मेलनास विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी यांचा मेळा भरणार आहे. सह्याद्री देवराई चे प्रणेते आणि अभिनेते सयाजी शिंदे आणि दिग्दर्शक व लेखक अरविंद जगताप यांच्या पुढाकाराने हे वृक्ष संमेलन भरत आहेत.



(छायाचित्र - अनिल धायगुडे)

या वृक्ष संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडाचे झाड असणार आहे. तर डोंगरावरील दगडांची आकर्षक ठेवण ही निसर्गप्रेमींना भुरळ घालत आहे. सह्याद्री देवराई व वनविभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या जगातील पहिल्या वृक्ष संमेलनात मान्यवरांचे वृक्ष, वनस्पती, वन्यजीव यांच्यावर व्याख्याने होणार आहेत. 13 फेब्रुवारी सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन होईल 2020 रोजी सकाळी साडेअकरा श्रीकांत इंगनहलीकर यांचे 'दुर्मिळ वनस्पती' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

घरासाठी लोकांनी झाडं तोडली, आता घरं पाडून झाडं लावायची वेळ आलीय : सयाजी शिंदे

तर, 12:05 वाजता सी. बी. साळुंके हे 'गवताळ परिसंस्था' परिसंस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 12:05 वाजता बसवंत दुमने यांचे 'पर्यावरन खेळ' या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी 01:15 वाजता नंदु तांबे हे 'पक्षी झाडे सहसबंध' या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. 01:50 वाजता दिनकर चौगुले हे 'देवराई यशोगाथा' या विषयावर बोलणार आहेत. 02:15 वाजता महेंद्र चौधरी 'सुगंधी वनस्पतीची लागवड व तेल निर्मिती' या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. 03:00 वाजता पांडूरंग शितोळे हे शेद्रीय शेती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर 03:35 वाजता शेखर गायकवाड हे 'झाडे लागवड व देवराई निर्मिती यशोगाथा' यावर बोलणार आहेत. सायंकाळी 04:10 वाजता पोपट रसाळ हे वृक्ष बँकेची संकल्पना मांडणार आहेत.



(छायाचित्र - अनिल धायगुडे)

देशातलं पहिलं वृक्ष संमेनल बीडमध्ये, सयाजी शिंदेंच्या पुढाकाराने माळरानावर फुललं नंदनवन

14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता संजय नरवटे हे पीक व झाडांवरील रोग- किड व्यवस्थापन या विषयावर बोलणार आहेत. 11: 05 वाजता जयसिंग पवार हे पाणी व्यवस्थापन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत. यानंतर सुहास वाईंगनकर हे 'दुर्मिळ फुपाखरू' या विषवर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12:15 वाजता वृक्ष संवर्धनात महिलांचा सहभाग या विषयावर सुनंदाताई पवार ह्या आपले विचार व्यक्त करणार आहेत. 02 वाजता रघुनाथ ढोले हे रोपवाटीका या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. पालवन येथील देवराई प्रकल्पावर दोन दिवस रंगणारे हे वृक्ष संमेलन विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी नागरीकांसाठी एक अनोखी मेजवाणी असणार आहे. पालवन येथे होत असलेल्या जगातील पहिल्या वृक्ष संमेलनाचा समारोप 14 फेब्रुवारीला वनमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोपाचा कार्यक्रम 14 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता सुरू होणार आहे.

 Sayaji Shinde | अभिनेते सयाजी शिंदे लिखित 'तुंबारा' पुस्तकाचं प्रकाशन | ABP Majha