Zero Hour : पुन्हा एकदा मोदी सरकार की इंडि आघाडी बाजी मारणार ? महानिकालाची प्रतीक्षा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : पुन्हा एकदा मोदी सरकार की इंडि आघाडी बाजी मारणार ? महानिकालाची प्रतीक्षा इकडे जयंत पाटलांनी जी मागणी केलीय.. ती मागणी काँग्रेसनं दिल्लीत केलीय. देशात मतमोजणीला अवघे काही तास आहेत.. सत्ताधाऱ्यांकडून हॅटट्रिकचे दावे होतायत.. तर विरोधकांकडून यंदा 'आमचीच बारी' म्हंटलं जातंय.. आणि हे दावे-प्रतिदावे सुरू असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोठा आरोप केला.. गृहमंत्री अमित शाहांनी दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले.. अशी सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट ही टाकली.. जयराम रमेश यांच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेत त्यांना पत्र लिहिले.. केलेल्या दाव्यासंबंधीचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले.. तसंच कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने धमकावल्याची तक्रार दिली नसल्याचंही आयोगाने नमूद केलंय .. निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर जयराम रमेश यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली.. ते हा दावा कुठल्या आधारे करत आहेत याची माहिती देतील अशी अपेक्षा होती ...मात्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे १ आठवड्याचा वेळ मागितला. आयोगानं हि मागणी फेटाळली आणि आज ७ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले. त्यावर निवडणूक आयोग निष्पक्ष असलं पाहिजे असा टोला जयराम रमेशांनी लगावला..