Zero Hour with Nilesh Budhawle : अमित शाहांचा मुंबई दौरा; जागावाटप, चर्चा अन् मेळावे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणूक कुठलीही असो, ती प्राणपणानं लढायची, ही मोदी-शाहांच्या भाजपची कार्यपद्धती आहे. त्याची प्रचिती आगामी विधानसभा निवडणुकीतही येतेय. देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक दोनचे नेते अमित शाह हे केवळ सात दिवसांच्या अंतरानं दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मुंबई, ठाणे आणि उर्वरित कोकणातील जागांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज दिवसभर भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतले. शक्ती कार्यकर्त्यांची - प्रचिती आत्मविश्वासाची अशी या मेळाव्याची टॅगलाईन होती. मुंबईतील संवाद मेळाव्यात शाहांसोबत त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी एस. जयशंकर होते. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे केंद्रीय सह-संघटन मंत्री व्ही. सतिश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह इतर नेते-पदाधिकारीही मेळाव्याला उपस्थित होते.
शाहांच्या या दौऱ्यांमागे अनेक कारणं आहेत. या निवडणुकीत मुंबईत उत्तम कामगिरी करून दाखवणं हे सोपं नसणार, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानं दाखवून दिलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतील सहापैकी लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या. मुंबईची जनता लोकसभेसारखाच कौल आगामी विधानसभा निवडणुकीत देईल, असा आमचा अजिबात दावा नाही. पण विश्लेषणापुरतं पाहिलं तर ठाकरेंना अपर हँड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमित शाह ते पक्कं जाणून आहेत. आणि म्हणूनच लोकसभेत जागावाटप आणि प्रचार नियोजनात ज्या चुका झाल्या, त्या विधानसभेत होऊ नयेत, याची ते पुरेपूर काळजी घेणार. निदान भाजपचा तसा प्रयत्न असेल यात शंका नाही.