Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar : पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? भाजपचा डाव? राऊतांचा मोठा दावा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंडळी.. पाण्यावर काठी मारली तर पाणी वेगळं होतं, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं. पण शरद पवारांच्या सख्ख्या पुतण्याच्या म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीतून अजितदादा ते थेट सत्ताधारी महायुतीत जाऊन बसले.
त्यामुळं राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. पण राज्यातल्या राजकारणानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि मग त्या फुटीनं पवार कुटुंबही दुभंगलं. आधी लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीनं पवार कुटुंबीयांमधला दुरावा आणखी वाढला. त्यांची दिवाळीही वेगवेगळी साजरी झाली.
पण आता शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची काल दिल्लीत भेट घेतली आणि पवार कुटुंबीयांच्या मनात... राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनातही त्या दोघांनी एकत्र यावं अशी भावना निर्माण झाली आहे. कारण अजितदादांनी थोरल्या काकांची घेतलेली ही भेट पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणणारा ठरला होता.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आई आणि अजित पवारांच्या वहिनी सुनंदा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पवारसाहेब आणि अजितदादांनी कुटुंब म्हणून एकत्र यावं ही भावना बोलून दाखवताना सुनंदाताईंनी राजकारणावर थेट भाष्य करणं मात्र आवर्जून टाळलं. पाहूयात त्या काय म्हणाल्या आहेत?