Zero Hour : आषाढीची वारी ते शिवरायांची वाघनखं दिवसभरातील सकारात्मक बातम्या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : आषाढीची वारी ते शिवरायांची वाघनखं दिवसभरातील सकारात्मक बातम्या
. विठुरायाच्या पंढरीतून.. जिथं मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांनी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली.. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मध्यरात्रीपासून दर्शन रांगा लावल्या होत्या.. चंद्रभागेच्या तीरावर जवळपास १६ लाख वारकऱ्यांचा महापूर आला होता..
दुसरी सकारात्मक बातमी नवी मुंबईतून.. बहुप्रतिक्षीत नवी मुंबई विमानतळावर अखेर विमान उड्डाण पाहायला मिळालं.. या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी आज करण्यात आली.. या चाचणीत दोन विमानांनी सहभाग घेतला होता.. इथे रन वेचं कामही युद्धपातळीवर सुरु आहे.. गेल्याच आठवड्यात केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कामाची पाहणी करत आढावा घेतला होता..
आणि तिसरी सकारात्मक बातमी आहे साताऱ्यातून.. लंडनमधून येणारी बहुप्रतिक्षीत शिवकालीन वाघनखं अखेर साताऱ्यात दाखल झाली .. ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.. १९ तारखेपासून सर्वांना ही वाघनखं पाहता येतील..
पुरातत्व विभाग आणि कस्टम विभागानं ही वाघनखं मुंबईत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. लंडन येथील व्हिक्टोरिया संग्रहालयातून ही वाघनखं साताऱ्यात दाखल झाली आहेत..ही वाघनखं सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर आणि दिल्ली या शहरात शिवप्रेमींना बघता येतील. त्याचं वेळापत्रक लवकरच निश्चित होईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली.