Zero Hour Full : अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे मतदारांशी सौदा! राऊतांचा आरोप पटतो का? जनतेचं मत काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Full : अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे मतदारांशी सौदा! राऊतांचा आरोप पटतो का? जनतेचं मत काय?
लोकसभेच्या रणसंग्रामात, आज देशभरात पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला.. १९ एप्रिलला २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण, १०२ जागांसाठी मतदारराजा आपल्या मतदानाचा हक्क बजावणारय.. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे... नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर.. विदर्भातील या पाच जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेत.. यातील कोणत्या उमेदवाराला जनता कौल देते, हे ४ जूनला स्पष्ट होईलच..
आज जरी पहिल्या टप्प्याचा प्रचार संपलाय, तरी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे आणखी चार टप्पे पार पडायचे आहेत.. राज्यात उन्हाचा पारा चढा असताना, प्रचाराचही वातावरण तापलेलंय.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी 'एडी चोटी का जोर' लगावलाय.. दौरे, प्रचारसभा, गाठीभेटी, आश्वासनं.. यांचा बार उडवलाय.. स्पष्टवक्तेपणा हा दादांचा यूएसपी.. त्यामुळे अजितदादांचं फॅन फॉलोइंगही मोठंय.. पण त्यांचा हाच स्पष्टवक्तेपणा आता त्यांना अडचणीत आणणारा तर ठरणार नाही ना? असा सवाल उपस्थित होतोय.. निमित्त होतं, इंदापूरमधील डॉक्टर, व्यापाऱ्यांच्या संवादसभेचं.. आणि या सभेतील अजित पवारांच्या वक्तव्यावरून चांगलंच राजकारण रंगलंय.. पाहूयात अजित पवारांची इंदापूरच्या सभेतील ती वक्तव्य.