Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया 

जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या या प्रकरणानंतर 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांचे लक्ष विशेषतः महानगरपालिका निवडणुकांकडे लागले होते. निवडणुका जाहीर होताच भाजपचे आमदार गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटामध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टीकांचे टोक गाठले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, टीका-टिप्पणी आणि इशाऱ्यांमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले होते. कालचा निकाल पाहिला तर गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा नवी मुंबईत विजय मिळवा. या विजयानंतर गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola