Zero Hour : दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेगवेगळे पत्ते; पुजा खेडकर प्रकरणातील मोठी आपडेट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेगवेगळे पत्ते; पुजा खेडकर प्रकरणातील मोठी आपडेट गेले काही दिवस महाराष्ट्रात गाजत असलेल्या पुजा खेडकर आयएएस नियुक्ती प्रकरण गाजत आहेत.. आज सुद्धा नवी माहिती समोर आली. आय ए एस बनण्यासाठी पुजा खेडकर यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या राखीव कोट्याचा उपयोग केला हे आपण पाहिलंय. त्यासाठी आवश्यक असलेलं मेडीकल सर्टीफीकेट मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांतील सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांनी प्रयत्न केल्याचं आणि त्यासाठी वेगवेगळे पत्ते दिल्याचं समोर आलंय. पुजा खेडकर यांनी पाथर्डी तालुक्यातील त्यांच्या मुळ गावातील पत्त्याचा उपयोग करून अहमदनगर जिल्हा रुग्णालयातुन दोन वेळा दिव्यांग असल्याचं सर्टीफीकेट मिळवलं. यातील २०१८ साली मिळवलेल्या सर्टीफीकेटमधे त्यांना मेंटल डिसेबीलीटी असल्याचं नमूद करण्यात आले तर २०२१ च्या सर्टीफीकेट मधे पुजा खेडकर यांना दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस अशा दोन डिसेबलीटीज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. या संदर्भात आज अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्यात बैठक झाली.. तत्कालीन वैद्यकीय मंडळातील सदस्यांचा लेखी अभिप्राय आणि जमा केलेली कागदपत्रे यांचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकाऱ्याना लवकरच दिला जाईल असं त्यांनी सांगितलं.