Zero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही पाहाताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर...
दिवंगत चित्रपट निर्माते आणि अभिनेते राज कपूर म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका जमान्याचे जणू शोमन. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज त्याच राज कपूर यांच्या आठवणींमध्ये रमून गेल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं राज कपूर यांची नातवंडं म्हणजे रणबीर कपूर, करिना कपूर, करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्यासह कपूर कुटुंबातल्या अनेक सदस्यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेल्या कपूर कुटुंबातल्या अन्य सदस्यांमध्ये नीतू कपूर, आलिया भट, सैफ अली खान यांचाही समावेश होता. कपूर कुटुंबाच्या सदस्यांनी या भेटीत पंतप्रधानांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांना आपल्या मनातील प्रश्नही विचारले.
या साऱ्या मंडळींमध्ये रंगलेल्या गप्पा पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या भेटीचं निमित्त काय होतं? तर मंडळी, दिवंगत चित्रपट निर्माते आणि अभिनेते राज कपूर यांची जन्मशताब्दी येत्या १४ डिसेंबरला देशभर साजरी करण्यात येत आहे. आणि त्यानिमित्त १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत राज कपूर यांच्या चित्रपटांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव पीव्हीआर आयनॉक्स साखळीतल्या चित्रपटगृहांमध्ये संपन्न होणार असून, त्यासाठी कपूर कुटुंबीयांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
यावेळी करिना कपूरनं आपल्या तैमूर आणि जहांगीर या मुलांसाठी पंतप्रधान मोदींकडून खास संदेशही लिहून घेतला.
राज कपूर यांच्या चाहत्यांच्या आणि नव्या पिढीतल्या चित्रपटरसिकांच्या माहितीसाठी, आगामी महोत्सवात राज कपूर यांचे आग, आवारा, श्री ४२०, संगम आणि मेरा नाम जोकर आदी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर आपण पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबीयांमध्ये झालेला संवाद.