Zero Hour : महायुतीत कोणत्या पक्षाची होतेय गळचेपी ? राष्ट्रवादीवरून जोरदार रस्सीखेच !
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : महायुतीत कोणत्या पक्षाची होतेय गळचेपी ? राष्ट्रवादीवरून जोरदार रस्सीखेच ! जिथं मविआमध्ये एक-एका जागेवरुन एकजूटतेला तडा बसतोय.. तिथं महायुतीतही काही जागांवरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.. दबावतंत्र सुरु आहे.. त्यातली सगळ्यात जास्त चर्चेतील म्हणजे नाशिकची जागा...
नाशिक - परंपरेनं ही जागा शिवसेनेची.. इथं सध्या त्यांचेच हेमंत गोडसे खासदार आहेत.. मात्र, याच जागेवर छगन भुजबळ म्हणजेच पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा ठोकलाय .. एकंदरीत आम्ही तुम्हाला काल दाखवलेल्या व्हायरल व्हिडियोवरून तरी छगन भुजबळ हेच नाशिक लढवायला स्वतः इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. इकडे टिझर व्हायरल होत होता.. तिकडे गोडसेंचं टेन्शन वाढत होतं..
आणि त्यात भर पडली.. ती साताऱ्यामुळे.. आता तुम्ही म्हणाल साताऱ्यामुळे नाशिकचं टेन्शन कसं वाढू शकतं .... तर सांगते.. सातारा - जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून ... पण तिथे लढण्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे इच्छुक ... त्यासाठी त्यांनी दिल्ली गाठत ठाण मांडलं होतं.. मग, आता सातारा उदयनराजेंना द्यायचं असेल तर एकतर महाराजांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजेच, बरीच कटुता असलेल्या अजितदादांच्या पक्षातून निवडणूक लावी लागली असती.. नाहीतर भाजपाला साताऱ्याच्या बदल्यात दुसरी कुठलीतरी जागा दादांना सोडावी लागली असती ... तर राजकीय वर्तुळातील चर्चांचा आधार घेतला तर.. साताऱ्याच्या जागेबदल्यात... भाजपनं नाशिकची जागा अजित पवारांना देवू केलीय... आणि छगन भुजबळ पिक्चरमध्ये आले..
त्यामुळे कोटा राष्ट्रवादीचा ...उमेदवार भाजपचा आणि बळी गेला शिवसेनेचा ... अशी काहीशी परिस्थिती सातारा-नाशिकमुळे निर्माण झाल्याचं दिसतेय ...
त्यावर नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठलं.. एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले.. आणि काहीही झालं तरी नाशिक सोडणार नाही अशी भूमिका घेतली ... त्याआधीच नाशिकच्या याच जागेवरुन राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना झालंय