Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
राज्यात सध्या नगर परिषद निवडणुकीचा धुरळा उडलाय. अशात महायुतीच्या नेत्यांनी तर प्रचाराचा धडाका लावलाय, पण तिथेच... महाविकास आघाडीचे बडे नेते मात्र फारसे प्रचारात दिसत नाहीयेत...एक पत्थर तो तबियत से उछालो यारो म्हणताना ते दिसत नाहीयेत... आता हाच शेर आठवण्याच दुसरं कारण... महाविकास आघाडीला लागलेली गळती...आपल्याकडील शेवटची निवडणूक होती विधान सभेची... मात्र त्यावेळी अनेक मंडळी जी महाविकास आघाडीत होती, त्यांनी आघाडीला राम राम ठोकलाय... आकाश में सुराख हो ही नहीं सकता, असं वाटल्यामुळे त्यांनी आपलं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी उडी मारली असावी का? आणि हा शेर आठवण्याचं तिसरं कारण... ते अगदी वेगळं... ते म्हणजे कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा केलेला दारूण पराभव...
राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहतायत... नगर परिषदांच्या मतदानाची तारीख जवळ आलीये, तर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची सगळेच वाट पाहतायत. त्यामुळे सगळे पक्ष इलेक्शन मोडमध्ये आहेत. पण प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतंय ते महायुतीच्या नेत्यांनी. सत्ताधारी पक्षांचे केवळ मंत्रीच नव्हे, तर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी प्रचाराचा धडाका लावत दररोज तीन-चार सभा घेणं सुरु केलंय.
महाविकास आघाडीत मात्र सामसूम दिसतेय. म्हणजे तसे त्यांचे उमेदवार उभे आहेत, स्थानिक नेते प्रचारही करतायत... पण आघाडीतल्या तिन्ही मोठ्या पक्षांचे सर्वोच्च नेते, म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वगळले तर बाळासाहेव थोरात, नाना पटोले हे काही अजूनतरी आपला भाग वगळता प्रचारात दिसलेले नाहीत. ताकदीनं एकानंतर एक सभा घेत आहेत, राज्यभर फिरत आहेत, आपल्या आणि मित्र पक्षासाठी एकानंतर एक भाषणं ठोकत आहेत असं होताना दिसत नाहीये.
रविवारी संध्याकाळी निवडणुकीचा प्रचार संपेल. त्यामुळे आता प्रचारासाठी उणेपुरे चार दिवस राहिले असतानाही विरोधी पक्षांचे बडे नेते प्रचारासाठी पोचलेले नाहीत.