Zero Hour Maharashtra Lok Sabha Seat Sharing : महायुतीपासून महाआघाडी जागावाटपाचा सस्पेन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे.. राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी नाशिकवर दावा ठोकलाय.. काल परवापर्यंत मातोश्रीवर जाणारे, मविआ नेत्यांशी चर्चा करणारे राजू शेट्टी.. ऐनवेळी महायुतीशी हातमिळवणी करण्याची शक्यताय..ह्याच महाआघाडीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तर केला पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र महादेव जाणकारांना परत स्वतःकडे खेचल्यावर, जानकरांनी आज परभणीवर दावा सांगितलाय . त्यातच सर्वात मोठी बातमी .... प्रकाश आंबेडकर आता महाविकास आघाडीबरोबर नाही असे म्हणता म्हणता परत एकदा ते सोबत राहावेत यासाठी मविआ नेत्यांची आज आणि उद्या बैठका पार पडतायत..
लोकसभेच्या रणधुमाळीत दररोज.. दर तासाला.. नवनव्या घडामोडी घडतायत... कुणाची खप्पामर्जी होतेय.. तर कुणाची उमेदवारी जाहीर होतेय.. कुठे टोकाचे शत्रू गळाभेट घेतायत.. तर 'हम साथ साथ है' म्हणणारे मित्र ऐनवेळी हात दाखवतायत.. एकूणच काय तर, जागावाटप अन् उमेदवारीवरून सध्या जोरदार राजकीय समुद्रमंथन सुरू आहे.. या मंथनातून कुणाला काय आणि कोणाला काय मिळणार .... अशा अनेक बातम्यांचा सविस्तर आढावा आपण आज घेणार आहोत..त्याचबरोबर बघणार आहोत भाजपची मदत करणारे छुपे हात ... अदृश्य शक्ती ... म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ...आजच्या राज्यातील एका महत्वाच्या घडामोडीवर होता आपला प्रश्न .... तो पाहण्यासाठी जावूया आपल्या पोल सेंटरवर...