Zero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही पाहताय झीरो अवर... ज्येष्ठ उद्योगमहर्षी रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी विनंती करणारा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. महाराष्ट्र सरकारकडून उद्योगरत्न म्हणून दिला जाणारा पुरस्कार यापुढे रत्न पुरस्कार नावानं ओळखला जाणार आहे.. तसंच महाराष्ट्र उद्योग भवनाचं नामांतर देखील रतन टाटा उद्योग भवन असं करण्यात आलंय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिलीय. रतन टाटा यांच्या रुपानं एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक आपण गमावला असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोकप्रस्ताव मांडताना व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची विनंती केली आहे.
झीरो अवरच्या या बुलेटिनमध्ये आपण तूर्तास तरी इथेच थांबूया. पण उद्याच्या झीरो अवरमध्ये पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजून ५६ मिनिटांनी. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहात राहा एबीपी माझा.