Zero Hour : मतमोजणीआधी विरोधकांकडून कार्यकर्त्यांना सावधानतेचं आवाहन!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : मतमोजणीआधी विरोधकांकडून कार्यकर्त्यांना सावधानतेचं आवाहन! नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार की भाजपला सत्तेतून खाली खेचत इंडि आघाडी धक्कादायक विजय नोंदवते हे उद्या ठरणार आहे. पण, या निकालाआधीच महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा भुकंप येतो की काय? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.. चर्चा होती की, भाजप नेते प्रसाद लाड यांनी मातोश्री बंगल्यावर फोन करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी उद्धव ठाकरेंकडे वेळ मागितली.. अर्थात अनेक माध्यमांनी अशीच बातमी चालवली.. पण, एबीपी माझानं बातमीची सत्यता पडताळली.. थेट प्रसाद लाड यांनाच फोनचं वृत्त किती खरं.. किती खोटं हे विचारलं.. आणि प्रसाद लाड यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं.. की त्यांनी असा कोणताही फोन केला नाही.. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली नाही.. त्यामुळे वेगवेगळ्या वाहिन्यांनी केलेले फोनसंदर्भातले दावे खोटे ठरले..