Zero Hour : पुण्यात सापडलेले 5 कोटी कुणाचे? राऊतांचा रोख शहाजीबापू पाटलांकडे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहै पैसे कुणाचे आहेत, ते कुणाकडे पोहोचवण्यात येत होते याबद्दल पोेलीस,निवडणूक अधिकारी आणि आयकर विभाग काहीही सांगायला तयार नाहीयत. पाच कोटींची रक्कम सापडली, त्या कारमध्ये असलेल्या चौघांनाही चौकशीनंतर सोडून देण्यात आलं.
पण विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट कुणाचं नाव घेतलं नाही. पण सत्ताधारी महायुतीतील ज्या आमदाराचा काय झाडी, काय डोंगार हा डायलॉग व्हायरल झाला होता, त्याच्याकडे हे पैसे पोहोचवले जात होते, असा आरोप त्यांनी केला. दोन अधिक दोन केले तर राऊतांचा रोख शिंदेंचे सांगोल्यातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे होते हे उघड आहे. बरं गाडीचं पासिंग देखील MH 45 आहे, म्हणजे अकलूज RTO. अकलूज आणि सांगोल्यात अवघ्या ७० किलोमीटरचं अंतर आहे. एवढंच नाही तर कारमधील चौघांपैकी एकजण हा शहाजीबापूंचा नातेवाईक आहे, तर दुसरी व्यक्ती ही त्यांची निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातंय.
पण तरीही, पाच कोटींची रक्कम शहाजीबापूंकडेच पोहोचवली जात होती, हे अजून सिद्ध झालेलं नाही, पोलिसांनी तसा अंदाजही वर्तवलेला नाही, हे आम्ही इथे स्पष्ट करू इच्छितो.
याच्याशीच निगडित होता आमचा आजचा दुसरा प्रश्न.. पाहूयात..