Zero Hour : हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर नाराजी !
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर नाराजी ! महायुतीच्या मैत्रीची खरी सत्व परीक्षा आहे ती बारामतीत. त्यामुळे जरा आजची सर्व ऍक्शन जिथे होती त्या इंदापूरमध्ये जावूयात.. बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांना, मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजपकडूनच विरोध झाल्याचं आपण पाहिलं.. तोच विरोध शांत करण्यात यश आल्याच्याही बातम्या आल्या. त्यात प्रामुख्याने दोन नावे होती - हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे. मात्र खरंच त्यांचा विरोध शमला का हा सवाल आज का विचारतेय? तर त्याला कारणीभूत आहे आजचा इंदापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांंचा मेळावा.. आणि त्याआधी भाजप नेते आणि अजित पवारांचे राजकीय विरोधक हर्षवर्धन पाटलांंनी आपल्या भावनांना मोकळी करून दिलेली वाट... मुंबईत फडणवीसांची हर्षवर्धन पाटलांबरोबर बैठका झाल्या.. मग अजित पवारांंना सोबत घेऊनही बैठक झाल्या, नंतर २०० कार्यकर्त्यांसमेत ही फडणवीसांनी अडचणी ऐकल्या ... पण तरीही आज फडणवीसांना परत एकदा इंदापूरात जाऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा लागला ... पाहुयात.. आजच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली समन्वयाची भूमिका ....