Zero Hour Full : हिंदू मतांचं एकत्रीकरण ते मविआ महायुतीची जागावाटपासाठी खलबतं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअब की बार महायुती सरकार... अगली बार भाजपा सरकार...
ही घोषणा आहे... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची...
आणि त्यांनी ही घोषणा कुठे दिलीय... तर ते ठिकाण आहे... मुंबई...
निमित्त होतं.. ते भाजपचा पदाधिकारी मेळावा..
गेल्या सहा दिवसांत अमित शाहा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.. आहे ते आहेत मुंबईत... त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अमित शाह यांचा हा अतिमहत्त्वाचा दौरा यासह दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचं विश्लेषण आपण करणार आहोत... नमस्कार मी विजय साळवी... झीरो अवरच्या आजच्या नव्या कोऱ्या भागात आपलं स्वागत...
आज महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहिली... किंवा त्यांची चर्चा करायचं म्हटलं... तर ती अनेक पातळ्यांवर बदललेली दिसतेय.... मराठवाड्यात वाढलेला मराठा विरुद्ध कुणबी संघर्ष हा त्यातलाच एक भाग.. मराठा नेते मनोज जरांगेंच्या राज्यव्यापी आरक्षण लढ्याचा फक्त सामाजिकच नाही तर राजकीय परिणामही झालाय.. आणि त्याचा सत्ताधाऱ्यांना कसा राजकीय फटका बसलाय हे आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात पाहिलं..
लोकसभा निवडणूक होऊन आता शंभर दिवस झालेत. आणि राज्यातल्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्यात. पण तरीही राज्यातल्या महायुती सरकारला या संघर्षावर औषध सापडलेलं नाही.
मग, असं असतानाच जातीय गणितांवर धार्मिक तोडगा काढण्याचा प्रयत्न तर महायुती सरकार करत नाहीय ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.. खरं तर, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली असं म्हणत एकनाथ शिदेंनी बंडखोरी केली होती. तेव्हापासून आजपर्यंत महायुती सरकारनं कायम आक्रमक हिंदुत्वाचाच पुरस्कार केला. पण, गेल्या काही दिवसांमध्ये त्या गोष्टींमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येतंय.. शिंदे-फडणवीसांच्या मठ-महंतांना भेटीगाठी वाढल्यायत..
आता गेल्या ४८ तासांमधले कार्यक्रम पाहा... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा भाईंदरमध्ये भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलन कार्यक्रमात पोहोचले.. तिथं त्यांनी स्वामी विद्याभास्करजी, ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी शंकराचार्य सदानंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले.. इतकंच नाही तर या सगळ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं..
नेमके त्याच वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात कण्हेरी मठातील संत सोहळ्यात पोहोचले.. तिथं त्यांनी लव्ह जिहाद, व्होट जिहादपासून शरद पवारांपर्यंत अशा सगळ्या मुद्द्यांवरुन भाष्य केलं..
आता आजचा दिवस बघा.. सकाळी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पाद्यपूजन सोहळा पार पडला.. उत्तराखंडमधील बद्रिकाश्रम ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते हे पूजन झालं.. त्यानंतर मुख्यमंत्री व्हाया सांगली कोल्हापुरातल्या कण्हेरी मठामधल्या संत सोहळ्यात पोहोचले...
खरं तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. दोघांच्याही या भेटीगाठींमधून हिंदू मतांचं एकत्रीकरण साधण्याचा प्रयत्न होतोय.. आणि त्यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न... तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला...
झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येतायत तसतशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधली जागावाटपासाठीची खलबतं वाढलीयत.
महाविकास आघाडीच्या २०० हून अधिक जागांवर उमेदवार निश्चित झाल्याचं कळतं. म्हणजेच, अंदाजे ८० जागांवरचा तिढा अजूनही कायम आहे असं समजायचं का, असा प्रश्न उपस्थित होतो. लोकसभा निवडणुकीत सांगलीचा एक अपवाद वगळता, जागावाटप बऱ्यापैकी शांतपणे पार पाडणं मविआला जमलं होतं. तसंच महायुतीच्या बऱ्याच आधी त्यांनी आपले उमेदवारही जाहीर केले होते. त्याचा फायदा त्यांना अनेक ठिकाणी झाला, कारण तयारी करण्यासाठी उमेदवारांना पुरेसा वेळ मिळाला. दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, शिर्डी ही त्याची काही उदाहरणं.
तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे लवकरात लवकर जागावाटप पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज रात्री उशिरा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीनं अनेक जागांवर घोळ घातला होता. नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई ही त्याची काही उदाहरणं. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महायुती मागच्या चुका सुधारून वाद चव्हाट्यावर न येऊ देता जागावाटप करणार ते पाहावं लागेल, आणि त्यामध्ये अमित शाहांची भूमिका महत्त्वाची असणार यात तीळमात्र शंका नाही.
पुढे जाण्याआधी पाहूयात आजचा आपला प्रश्न काय होता.