✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP Majha

सलमान शेख   |  10 Feb 2025 09:53 PM (IST)

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा आणि अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे भेटीसाठी दाखल झाले आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. मुख्यमंत्री सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन दिग्गज नेत्यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चेला उधाण आले आहे. 


राजकीय नेते भेटल्यावर राजकीय चर्चा होणे स्वाभाविक आहे- प्रसाद लाड


दरम्यान, या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. यावर बोलतांना भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आपली प्रतिक्रिया देत ही भेट मैत्रीपूर्ण भेट असल्याची माहिती दिली आहे. राजकीय नेते भेटल्यावर राजकीय चर्चा स्वाभाविक होणारच, यात दुमत नाही,असेही प्रसाद लाड म्हणाले.


राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये एक कॅफे उघडलाय- संजय राऊत 


राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे एक कॅफे उघडला होता एवढेच मला माहिती आहे. तिथे काही लोक सातत्याने चहापाण्यासाठी जात असतात आणि तो सर्वासाठी खुला आहे. किंबहुना राजकारणातली ही चांगली गोष्ट असून असे चहापान होत असतात. चांगला कॅफे असला तर लोक जात येत असतात त्यांना चांगला नजारा बघायला मिळतो, बसायला उत्तम जागा मिळते, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून संजय राऊत यांनी भाष्य करत ही टीका केली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP Majha

TRENDING VIDEOS

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले1 Hour ago

Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे2 Hour ago

Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?3 Hour ago

Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO4 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.