Zero Hour Amit Thackeray Mahim Vidhan Sabha : राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडून येणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Amit Thackeray Mahim Vidhan Sabha : राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडून येणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती ती, आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? अखेर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मनसेच्या तिकीटावर मुंबईच्या माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना, मनसे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या दृष्टीनं माहीम मतदारसंघाला अनेक कारणांंनी ऐतिहासिक महत्व आहे. पहिलं कारण म्हणजे शिवसेनेचा जन्म हा दादरच्या कदम मॅन्शनमध्ये झाला होता. दस्तुरखुद्द राज ठाकरे हेही कदम मॅन्शनमधल्या त्याच घरात लहानाचे मोठे झाले. तिथूनच त्यांनी आपला मुक्काम हा आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ निवासस्थानी हलवला. शिवसेनाप्रमुख या नात्यानं बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा शिवाजी पार्कवर पार पडली होती. त्यानंतर ३९ वर्षांनी राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली सभा शिवाजी पार्कवरच घेतली होती. ही दोन्ही ठिकाणं माहीम मतदारसंघात मोडतात. शिवसेना भवन, मनसेचं राजगड हे कार्यालय आणि राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ हेही याच मतदारसंघात आहेत. अमित ठाकरेंच्या रुपानं ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. २०१९ साली आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे हेही आमदार आहेत, पण त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला होता, म्हणजे प्रत्यक्ष जनतेतून निवडून येण्याचा मार्ग त्यांनी तेव्हाही स्वीकारला नव्हता. अमित ठाकरेंना तिकीट मिळालं तर महायुती किंवा ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाही अशा चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र तसं झालं नाही. माहीममधून शिंदेंच्या शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळं मनसेचा एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नव्हता. तसंच दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात महायुतीच्या राहुल शेवाळे यांना माहीम मतदारसंघात आघाडी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंना प्रश्नही विचारण्यात आला, पाहूयात त्यांनी काय उत्तर दिलं.