Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
बायको माहेरी कधी जाते? असं एखाद्या नवऱ्याला विचाराल तर तो सतराशे साठ कारणांची यादी देऊ शकतो... मात्र सतराशे साठ कारणामध्ये आता एका नव्या कारणाची भर पडलीय.... आणि हे कारण सध्या राजकीय वर्तुळात चांगलच चर्चेत आहे.. आता जास्त उत्सुकता न ताणता हे प्रकरण नेमकं काय आहे पाहुयात
१० वर्षे नगरसेविका
३ वर्षे महापौर
३ वर्षे भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सदस्या
याशिवाय भाजपसाठी महाराष्ट्र प्रवक्ता आणि सचिव पदं भूषवणाऱ्या अर्चना डेहनकरांचा चेहरा नागपूरसाठी चांगलाच परिचयाचा आहे..
ही वेगवेगळी पदं भूषवताना अर्चना डेहनकरांच्या कामगिरीची जेवढी चर्चा झाली नाही...
...त्यापेक्षा जास्त चर्चा सध्या त्यांच्या माहेरवासाची सुरू आहे
कारण अर्चना डेहनकरांनी पतीच्या घराचा उंबरठा ओलांडून भावाचं घर गाठण्यामागचं कारणही तसंच आहे..
अर्चना यांचे पती विनायक डेहनकरांनी नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात बंडाचं निशाण फडकवलंय..
त्यामुळे पतिव्रता की पक्षनिष्ठा? असा यक्षप्रश्न अर्चना यांच्यासमोर उभा ठाकला..
वारंवार समजावूनही मिस्टर डेहनकर माघार घ्यायला तयार नसल्यानं अखेर अर्चना यांनी भावाचं घर गाठलं