Zero Hour Allu Arjun Gets Bail : अटक... कोठडी... जामीन...; अल्लू अर्जुनला न्यायालयाचा दिलासा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंडळी.. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा टू हा चित्रपट देशभर अक्षरश: धुमाकूळ घालत असताना, याच चित्रपटाच्या एका शोदरम्यान झालेल्या अपघातानं तो अडचणीत आला आहे. या प्रकरणात अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली होती आणि तेलंगणातल्या दिवाणी न्यायालयानं त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली. पण अखेर तेलंगणा उच्च न्यायालयानं त्याला अंतरिम जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे. ‘पुष्पा टू’ या चित्रपटाच्या संध्या थिएटरमधल्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी झाली होती.. त्यावेळी अल्लू अर्जुन थिएटरमध्ये उपस्थित होता.. आणि त्याच चेंगराचेंगरीत एका ३५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला होता. ((त्यावेळी. त्यामुळं थिएटर आणि आसपासच्या परिसरात मोठी गर्दी उसळली होती. त्या परिस्थितीत झालेल्या चेंगराचेंगरीत त्या महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षायंत्रणेला गर्दीचं नियंत्रणं करण्यात अपयश आल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. कारण त्या महिलेच्या पतीनं त्याच मुद्द्यांवर चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात अल्लू अर्जुनला हैदराबाद येथील त्याच्या घरातून आज अटक करण्यात आली होती..