✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report

abp majha web team  |  21 Jan 2026 11:45 PM (IST)
ABP News

Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report


आणि यानंतर आपण विदर्भात जाऊयात तिथे चंद्रपूरच्या मतदारसंघांनी सर्वाधिक नगरसेवक निवडून दिले ते काँग्रेसचे त्यामुळे साहजिक चंद्रपुरात महापौर बसवण्याची सुवर्ण संधी आहे ती काँग्रेसलाच मात्र या संधीचं सोनं करण्याऐवजी काँग्रेसचे नेते हे आपआपसातच वर्चस्व ची लढाई लढण्यात मशगूल आहेत आणि या लढाईत महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचा हातच चंद्रपूर मध्ये गमावला जाणार का असा प्रश्न विचारला जातो का आणि कशासाठी याचा आढावा घेणार हा पुढचा स्पेशल रिपोर्ट खरं तर हा मतदारसंघ माझा आहे मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणीही बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे. खासदार झाले म्हणजे काय जिल्ह्याची किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचं ही काम आहे आणि खासदारांचं ही काम आहे. माझं स्पष्ट आहे मी स्पष्ट बोलणारी बाई आहे मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. आता प्रतिभा यांना येऊन सुद्धा सहा वर्षे झालेत पण अक्खा जिल्हाच माझा आणि मी म्हणेल तसं होईल असं होणार होणं शक्य नाही. तुम्हाला जर का आमची गरज नसेल किंवा पक्षाला गरज नसेल तर आम्ही घरी बसू आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करू. चंद्रपुरातल्या काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यां मधलं हे वाद युद्ध आता दिल्ली दरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. खरं तर चंद्रपूर महानगरपालिके 27 जागा जिंकून काँग्रेस भाजपा पेक्षाही मोठा पक्ष ठरलाय. मात्र काँग्रेसचे नेते बहुमताचा आकडा गाठण्यासाठी धडपडताना कमी आणि एकमेकांशी भांडण्यामध्येच धन्यता मानताना दिसतायत. एकीकडे महाराष्ट्र काँग्रेसचा मोठा चेहरा आणि माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेत्तीवार तर दुसरीकडे आक्रमक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आपली राजकीय ताकत सिद्ध करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी काँग्रेस नगरसेवकांचीच पळवापळवी सुरू केली आहे. आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेलं खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून घेऊन अशी वेगवेगळी गट करायची गरज नव्हती का नेलं ते मला माहित नाही आणि कोणी नेलं हे म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विजूभाऊ वडेत्तीवार यांचे काही लोकं त्यांनी त्या नगरसेवकांच्या घरी अक्षरशः रॅलीतून असताना रॅलीतून असताना काही नगरसेवकांना त्यांनी उचलून नेलं. मी जर असं म्हटलं की जे नगरसेवक आहेत त्यांना जर सोडलं तर सर्वच नगरसेवक माझ्याकडे येतील. एक दोन चार सोडलेत पण आपल्याला तसं करायचं नाही कोणाला स्वतः खासदार जाऊन त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून आपल्या घरी घेऊन गेलेत. हे ही त्या लोकांना माहित आहे त्यातील अनेकांनी मला फोन करून सांगितलं. दरम्यान काँग्रेसचे चंद्रपूरचे माजी शहराध्यक्ष बाबू तिवारी यांनी खासदार प्रतिभा धानोरकरांबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केलाय. खासदार मॅडम आहेत त्यांनी पण थोडसं संयम धारीने घ्यायला हवे ते स्वतः जाऊन जे शहराचे अध्यक्ष आहेत महिला अध्यक्ष आहेत बाकी महिला सदस्य आहेत त्यांना ते घरून पकडून रॅलीमध्ये पकडून अ घेत आहे अ घेऊन जात आहे तर ते पण बरोबर नाही आणि आम्हाला माहित आहे की ते कुठे आहेत अ त्यांचे जे आमचे सदस्य आहेत ते 13 सदस्य यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना लॉकअपमध्ये ठेवलं आहे. विजय वडेत्तीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोन नेत्यांमधला वाद आता थेट चंद्रपूरच्या राजकीय मालकीपर्यंत येऊन पोहोचलाय. एबीपी फॉर्म तुम्ही दिले पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आले तेव्हा अर्धे तुमचे अर्धे आमचे विषय अजिबात आला नाही आणि खरं तर हा मतदारसंघ माझा आहे मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणीही बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे. खासदार झाले म्हणजे काय जिल्ह्याची किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचं ही काम आहे आणि खासदारांचं ही काम आहे. अक्खा जिल्हाच माझा आणि मी म्हणेल तसं होईल असं होणार होणं शक्य नाही कोणीही ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व होते मान्य करणार नाही. सगळ्यांना मिळून मिसळून काम करावं लागतं तेव्हाच रिझल्ट येतो. विजय वडेत्तीवारांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष द्यावं असं सल्ला प्रतिभा धानोरकरांनी दिलाय. मात्र आपल्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये असा इशारा द्यायला त्या विसरल्या नाहीयेत. त्यांनी अक्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणीही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतच ते मर्यादित नाही आणि माझं स्पष्ट आहे मी स्पष्ट बोलणारी बाई आहे मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. विजय वडेत्तीवारांच्या विरोधात सुरू झालेल्या वर्चस्वच्या लढाई प्रतिभा धानोरकरांनी अखेरीस ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. त्यांनी थेट राजीनाम्याचाच इशारा दिलाय. तर विजय वडेत्तीवारांनी धानोरकरांवरती केलेल्या उपकाराचा पाढा वाचत जरा सबुरीने घेण्याचा सल्लाही दिलाय. 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.