Zero Hour Uddhav Thackeray Marathwada : ठाकरेंचा मराठवाडा दौरा, कर्जमाफीवरून पुन्हा आरोपांच्या फैरी
abp majha web team | 05 Nov 2025 10:02 PM (IST)
झी मराठीवरील 'झीरो आवर' या कार्यक्रमात अँकर पूर्वी भावे यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यामुळे पेटलेल्या राजकीय वादावर चर्चा केली. 'निवडणुकीच्या आधी माझ्याकडे देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ आहे, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, कोरा, कोरा करणार म्हणाले होते, आता कुठे गेला?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. आपल्या चार दिवसीय दौऱ्यात ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजारांच्या मदतीची मागणी केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहार दौऱ्यावर टीका करत, त्यांना 'आंतरराज्य मंत्री' असे विशेषण दिले. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, 'उद्धव ठाकरे तोंडाला येईल ते बोलतात, विकासावर एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा' असे आव्हान दिले.