Zero Hour Sarita Kaushik : दिल्ली स्फोटावर एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय?
abp majha web team | 11 Nov 2025 09:54 PM (IST)
पूर्वी दिल्लीतील स्फोट आणि देशांतर्गत दहशतवादी नेटवर्कच्या धोक्यावर एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी विश्लेषण केले आहे. ‘भारतावर हल्ला केला तर जिथून हे अतिरेकी आले तिथे हल्ला केला जाईल, यालाच उत्तर म्हणून भारतातच जिहादी अतिरेकी तयार करून हल्ल्यासाठी वापरण्याची पाकिस्तानची ही यशस्वी रणनीती म्हणायची का?’ असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या चर्चेनुसार, हल्ल्यामागे असलेले लोक उच्चशिक्षित असून याला 'डॉक्टर मॉड्यूल' म्हटले जात आहे. हे दहशतवादी मूळचे जम्मू-काश्मीरचे असले तरी, अनेक वर्षांपासून फरीदाबाद, लखनौ, हैदराबाद आणि कानपूर येथे कार्यरत होते. भारताच्या नवीन धोरणानुसार सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना तिथेच प्रत्युत्तर दिले जाईल. यालाच शह देण्यासाठी पाकिस्तान भारतातच जिहादी नेटवर्क तयार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी अधिक सतर्क राहून देशातील असे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याचे मत सरिता कौशिक यांनी मांडले.