Zero Hour : शिष्टमंडळ भेटीच्या निमित्तानं मविआला 'राज ठाकरे' हा नवा चेहरा मिळालाय का?
abp majha web team | 14 Oct 2025 09:14 PM (IST)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली, यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'महाविकास आघाडी नसून महा कन्फ्युज्ड आघाडी आहे', असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला आहे. ठाकरे बंधू एकत्र दिसल्याने आणि त्यांनी शिवालय ते मंत्रालय प्रवास एकत्र केल्याने नव्या राजकीय समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, 'मी महाविकास आघाडीत नाही', असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले असले तरी, या भेटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे सर्व नेते उद्या पुन्हा आयोगाला भेटणार असून, राज ठाकरे त्यांच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे या 'सस्पेन्स'मागे नेमका काय अर्थ दडला आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.