Zero Hour Bachchu Kadu Protest: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाबाबत जनतेचा कौल काय?
abp majha web team | 28 Oct 2025 09:30 PM (IST)
बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या शेतकरी आंदोलनावरून (Farmer Protest) लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम महायुती (Mahayuti) सरकारवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका दर्शकाने म्हटले आहे, 'बच्चू कडूनचे सर्वाधिक नुकसान होईल. राजकीय दृष्ट्या साइडलाइन झाल्यावरती ते आंदोलन करतात. मोठे झाल्यावरती थंड होतात.' लोकांच्या मते, महायुती सरकारच्या योजना निधीअभावी बंद होत असून शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, ज्यामुळे सरकारला मोठा फटका बसेल. 'निवडणुका जवळ आल्या की दुसरेच मुद्दे उभे राहतील' आणि 'जे सत्तेत नसतात त्यांनाच शेतकऱ्यांचे प्रश्न दिसतात', अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत. 'गुवाहाटीला गेला तेव्हा शेतकरी दिसला नाही का?' असा सवाल करत बच्चू कडूंच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. सत्तेत येणारे प्रत्येक सरकार 'सातबारा कोरा करण्याचे' वचन देते, पण नंतर विसर पडतो, ही खंतही अनेकांनी बोलून दाखवली.