MNS - MVA Zero Hour : मराठीवादी, हिंदुत्ववादी मनसे काँग्रेसच्या पचनी पडणार?
abp majha web team | 13 Oct 2025 09:18 PM (IST)
राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी? मनसे (MNS) आणि काँग्रेस (Congress) युतीच्या चर्चांना उधाण आले असून, यावर मनसे नेते योगेश चिले (Yogesh Chile) आणि काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 'राजकारणात कोणीही स्पृश्य किंवा अस्पृश्य नसतं, वेळप्रसंगी राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात,' असे सूचक विधान योगेश चिले यांनी केले आहे. तर दुसरीकडे, 'मनसे पक्षाशी आमचे वैचारिक मतभेद आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कृती काँग्रेसच्या विचारधारेशी जुळणाऱ्या नाहीत,' असे सचिन सावंत यांनी स्पष्ट केले. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले. उदय सामंत यांनी सावरकरांवरील काँग्रेसच्या भूमिकेचा मुद्दा उपस्थित केला असता, बाळासाहेबांचे विचार वेगळे असूनही शिवसेनेने काँग्रेससोबत युती केली होती, त्यामुळे मोठा शत्रू समोर असताना वैचारिक मतभेद बाजूला ठेवावे लागतात, असे चिले म्हणाले.