Vare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 03 ऑक्टोबर 2024

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा १३ तारखेनंतर होण्याची शक्यता, ८ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल, ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता.
सिल्वर ओकवर हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा, इंदापूरातून शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील लढणार का याकडे लक्ष.
हर्षवर्धन पाटील ४ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यता, ६ किंवा ७ तारखेला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार.
ज्यांना भाजपमध्ये तिकीट मिळेल असं वाटत नाही, ते दुसऱ्या पक्षात जातात, हर्षवर्धन यांना भास होतोय पवारांसोबत जाऊन फायदा होईल, भाजपच्या चंद्रकांत पाटलांची हर्षवर्धन पाटलांवर टीका.
शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळवी, गुणरत्न सदावर्ते यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार, मनसेकडून संदीप देशपांडे वरळीतून लढणार असल्याची चर्चा.
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला दसऱ्यापूर्वी येण्याची शक्यता, महायुतीत १० ते १२ जागा सोडल्या तर जागावाटपावर एकमत, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती.
राजकारणात महत्त्वाकांक्षा निष्ठेच्या वर गेल्यास काही पर्याय नाही, भाजपकडून तिकीट मिळणार नाही म्हणून जे दुसऱ्या पक्षाचा आधार घेतात त्यांनी तसं करू नये, हर्षवर्धन पाटीलांवरून चंद्रकांत पाटील यांचं भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन.