Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report
नवनीत राणा. ठाकरेेंच्या शिवसेनेशी हनुमान चालीसावरून दोन हात करणाऱ्या नेत्या. भाजपच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या. त्यांचा पराभव झाला, ज्याची सल त्यांच्या मनात अजूनही असावी. त्यात आता महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्यामुळे या निवडणुकीत नवनीत राणा मूळ पक्ष युवा स्वाभिमानच्या की, तिकीट देणाऱ्या भाजपच्या बाजूने हा प्रश्न निर्माण झालाय...
अमरावती महापालिकेचं बिगुल वाजलंय आणि शह-काटशहाची लढाईदेखील सुरु झालीय. याला निमित्त ठरलंय युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्याची स्तुती करताना माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेलं एक वक्तव्य.
अमरावतीच्या साई नगर प्रभागातून २०१७ मध्ये भाजपचे तुषार भारतीय निवडून गेले होते. त्याच प्रभागातून यंदा युवा स्वाभिमानच्या सचिन भेंडेंनी उमेदवारी मागितलीय. याच भेंडेंना बळ देताना भाजपच्याच नवनीत राणा यांनी जोरदार बॅटिंग केलीय.
अमरावतीसंदर्भात नवनीत राणा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपची नाही म्हटली तरी थोडी पंचाईतच झाली भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यावर प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय... ऐकुयात
खांद्यावर भाजपचा झेंडा आहे... मात्र पती रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत, भाजपच्याच संभाव्य उमेदवाराचा अपप्रचार करून नवनीत राणांनी पक्षशिस्तीचा भंग केलाय का? या प्रश्नाचं उत्तर भाजप नवनीत राणांचे कान टोचतं की पाठिशी घालतं यावरून मिळणार आहे