चिखलदऱ्यात जगातला तिसरा काचेचा स्कायवॉक, गोराघाट पॉईंट ते हरीकेन पॉईंटपर्यंत उभारणी : अमरावती
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
27 Jun 2021 08:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे स्काय वॉक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्काय वॉक भारतातील पहिला असून जगातील तिसरा आहे. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये राज्यातूनच नव्हे देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल. मेळघाटच्या चिखलदरातील गोराघाट पॉईंट पासून ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्काय वॉक 407 मीटरचा हा प्रकल्प 2018 मध्ये प्रस्तावीत करण्यात आला आहे. यासाठी 34.34 कोटी रुपये खर्च होणार आहे. याचे जलद गतीने काम देखील सुरू आहे. भारतातील पहिला आणि जगातील तिसरा हा गगन भरारी पूल आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्काय वॉकने जोडण्यात येईल.