Special Report : चोरासोबत झटापट, ठाण्यात लोकलखाली येऊन महिलेचा मृत्यू, तीन मुलींचं छत्र हरपलं
अभिजीत देशमुख एबीपी माझा | 02 Jun 2021 12:11 AM (IST)
मोबाईल चोराशी झटापट करताना लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झालाय. कळवा रेल्वे स्थानकात लोकल खाली आल्यामुळे या महिलेला जीव गमवावा लागला आहे. विद्या पाटील असं या महिलेचं नाव आहे. त्या शनिवारी संध्याकाळी लोकलनं प्रवास करत होत्या. त्याचवेळी लोकलच्या महिला डब्ब्यातून केवळ पाच महिला प्रवास करत होत्या. कळवा रेल्वे स्थानकातून लोकल मार्गस्थ होत असतानाच एका चोरट्यानं लोकलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यानं विद्या यांच्या हातातून मोबाईल घेत पळ काढला. तेवढ्यात चोरट्याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात त्या लोकलमधून खाली उतरल्या, मात्र तोवर प्लॅटफॉर्म संपला आणि रेल्वेखाली आल्यानं त्यांचा मृत्यू झाला.