कोरोनाची तिसरी लाट? नागरिकांचा हलगर्जीपणा भोवणार? CSIR चे महासंचालक डॉ. शेखर मांडेंचं भाकित
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2021 01:21 AM (IST)
मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी वर्तवला आहे. 'एबीपी माझा'सोबत केलेल्या विशेष बातचीत दरम्यान डॉ. शेखर मांडे यांनी कोरोनाची लाट थांबवण्यासाठी लसीकरण आणि नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं म्हटलं.