खंडणी प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? सॅम खरा की साईल खरा?आर्यनने ड्रग्जच घेतले नाही मग प्रकरण कसं वाढलं?
निलेश बुधावले, एबीपी माझा | 02 Nov 2021 09:06 PM (IST)
मुंबई : किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असून आर्यन खान प्रकरणात त्याने समीर वानखेडेंच्या नावाने डील केली, त्याने प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडेंच्या नावाने सेव्ह केला आणि आपल्याला मध्यस्ती करण्याची विनंती केल्याचा गंभीर आरोप सॅम डिसूझा याने केला. सॅम डिसूझाने एबीपी माझाशी बोलताना हा गौप्यस्फोट केला.