Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

नंदुरबार शहरात आयोजित हिंदू धर्म जागृती सभेत कालीचरण महाराज यांनी केलेल्या विधानांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने नंदुरबार शहरात आयोजित करण्यात आलेल्या हिंदू धर्म जागृती सभेत कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानांनी राजकीय वातावरण तापवले आहे. 

राजकारणी खऱ्या अर्थाने हिंदूवादी नाहीत,ते मुसलमानांसमोर कुत्र्यासारखे शेपूट हलवतात,अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींवर टीका केली असून. कालीचरण महाराजांनी आपल्या भाषणात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, इस्लाम आणि ख्रिश्चन हे भारतातील मूळ धर्म नसून ते केवळ पंथ आहेत.

 भारतातील १०० टक्के मुसलमान हे पूर्वीचे हिंदूच आहेत. याचवेळी त्यांनी मुसलमानांना पुन्हा घरवापसी करण्याचे आवाहनही केले. राजकारणात हिंदूंच्या दुर्लक्षिततेचे कारण सांगताना त्यांनी व्होट बँक चा मुद्दा मांडला. मुसलमान इस्लामच्या हितासाठी १००  टक्के मतदान करतात, मात्र हिंदू ४५  टक्क्यांच्या वर जात नाही. हिंदू आपल्या सडक्या जातीवादासाठी मतदान करतो, हीच मोठी चूक आहे,असे ते म्हणाले. जोपर्यंत हिंदू  व्होट बँक बनून केवळ हिंदू हिताचा विचार करणाऱ्याला मतदान करत नाही, तोपर्यंत राजकारणी हिंदूंचे ऐकणार नाहीत, नंदुरबार शहरात हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या हिंदू धर्म जागृती सभेला मोठ्या हिंदू समाज उपस्थित होते...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola