#MarathaReservation मराठा आरक्षणाविरोधी 'ते' नेते कोण? कुठल्या नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध?
एबीपी माझा वेब टीम | 22 Sep 2020 04:15 AM (IST)
मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यानी दिली आहे. मराठा आरक्षण संदर्भात आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे बैठक पार पडली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याआधी अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.