Kolhapur Band Special Report : कोल्हापुरातल्या तणावामागे सुनियोजित षडयंत्र?
abp majha web team | 07 Jun 2023 09:07 PM (IST)
कोल्हापूर, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराचं शहर, पुरोगामी असं बिरुद मिरवणारं शहर, परंतु याच कोल्हापूर शहरात आज सकाळपासून तणाव निर्माण झाला होता. एका तरुणाच्या स्टेटसवरुन वादाची ठिणगी पडली आणि त्याविरोधात हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या. त्यानंतर शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या.