Special Report Ram Mandir : शंकराचार्यांचं हिंदू धर्मातलं योगदान काय? Narayan Rane यांचा सवाल
abp majha web team | 14 Jan 2024 09:24 AM (IST)
अपुर्णावस्थेतल्या राममंदिराला विरोध करत शंकराचार्यांनी सोहळ्याला न जाण्याचं जाहीर केल्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी टीकास्त्र सोडलंय. शंकराचार्यांचं हिंदू धर्मातलं योगदान काय असा सवाल नारायण राणेंनी केलाय. विरोधकांसह काही साधू महतांनी राणेंवर टीका केलीय...दरम्यान एका तासातच नारायण राणेंनी शंकराचार्यांवरील विधानावर घुमजाव केलाय.. शंकराचार्यांबद्दल मी तसं बोललो नाही, पत्रकारांनी वेगळा अर्थ काढला असं स्पष्टीकरण राणेंनी दिलंय..
उद्धव ठाकरेंनीही नारायण राणेंवर टीका केलीय.. भाजपने हिंदूंची माफी मागावी अशी मागणी ठाकरेंनी केलीय..