West Bengal Election : चहा कामगार महिलांच्या काय आहेत समस्या? दिवसरात्र राबून हातात फक्त 200रुपये...
अमोल किन्होळकर | 15 Apr 2021 06:17 PM (IST)
उत्तर बंगालचा प्रदेश हा चहाच्या बागांमुळे समृद्ध बनलाय. इथली अर्थव्यवस्था पर्यटनासोबतच चहावरही अवलंबून आहे. ज्या चहाच्या बागांनी दार्जिलिंग, सिलिगुडी, जलपायगुडी परिसराला समृद्ध केलं. त्या बागांमध्ये चहाची पानं तोडणाऱ्या महिला मात्र तटपुंज्या रोजंदारीवर दिवसभर काम करतात. या महिलांच्या अनेक समस्या आहेत. मात्र आतापर्यंतचं कोणतंही सरकार त्यांना न्याय देऊ शकलेलं नाहीय. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर सिलिगुडीमधल्या चहाच्या बागांमध्ये पोहोचले. त्यांनी या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.