Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी

Sambhajinagar MIM Result  : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी

मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकींचे निकाल जाहीर होत आहेत. भाजपला महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळताना पाहायला मिळत आहेत. या निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे असदुद्दीनं ओवेसी यांच्या एमआयएमनं महापालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रातील 29 पैकी 13 महापालिकेत एमआयएमचे 95 उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे एमआयएमनं मुंबईत देखील जोरदार मुसंडी मारली आहे. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा गड असलेल्या मानखुर्दमध्ये देखील एमआयएमनं दमदार विजय मिळवला आहे.  छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम दुसऱ्या स्थानावर आहे. एमआयएमनं मुंबईत मोठी मुसंडी मारली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या मानखुर्दमध्ये एमआयएमनं विजय मिळवला आहे. यामुळं अबू आझमी यांना मोठा धक्का बसला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola