Virat Kohli : विराट कोहलीची झोळी यंदाही रिकामीच; 2013 ते 2021 IPL विजेतेपदाची हुलकावणीच Special Report
abp majha web team | 12 Oct 2021 11:13 PM (IST)
आता बातमी क्रिकेटच्या मैदानातून. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला यंदाही आयपीएलच्या विजेतेपदानं हुलकावणी दिली. विराटला एक कर्णधार किंवा एक खेळाडू म्हणूनही आजवर कधी आयपीएल जिंकता आलेली नाही. यंदा एक कर्णधार या नात्यानं आपली ही अखेरची आयपीएल असेल असं विराटनं आधीच जाहीर केलं. त्यामुळं बंगलोरचा कर्णधार म्हणून विराट पहिल्यांदाच आयपीएल जिंकतो का? याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं होतं. पण कोलकात्याकडून झालेल्या पराभवानं बंगलोरचं आयपीएलमधलं आव्हान प्ले ऑफमध्येच संपुष्टात आलं. त्या पार्श्वभूमीवर पाहूयात आमचा प्रतिनिधी सिद्धेश कानसेचा हा स्पेशल रिपोर्ट...