Varanasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाराणसीत एका संघटनेने अनेक मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या आहेत...त्यामुळे, नव्या वादाला तोंड फुटलंय... हिंदू धर्मशास्त्रात साईबाबांचे पूजाविधी नसल्यामुळे साईंची पूजा करू नये अशी भूमिका त्या संघटनेने घेतलीय... वाराणसीतल्या या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागलेयत... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
कुठे हटवल्या साईंच्या मूर्ती?
साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप?
साईंच्या मूर्तींवरुन काय राज्यात काय प्रतिक्रिया?
सामाजिक शांतता राखण्याचं भान कोण पाळणार?
श्रद्धास्थानांना धक्का का लागतोय?
सनातन रक्षक सेनेचं म्हणणं काय? (फोटो- साईबाबा)
साईबाबा मुस्लीम होते,
त्यांचा सनातन हिंदू
धर्माशी संबंध नाही
साईबाबांच्या पूजेला
विरोध नाही. मात्र,
हिंदू मंदिरांत साईबाबांची
मूर्ती नको
२०१४ पासून साईबाबांच्या पूजेला विरोध सुरू झाला...त्यावेळेचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी हिंदूंनी साईबाबांना देव मानू नये आणि त्यांची पूजा करू नये असं आवाहन केल होतं..
काही दिवसांपूर्वी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी देखील साईबाबांच्या पूजेला विरोध केला होता...
आता वाराणसीतल्या घटनेनं हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय...
कुणाला मानायचं, कुणाची पूजा करायची?
हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो...
पण कुणाच्या श्रद्धेला धक्का लागून
सामाजिक शांतता बिघडू नये,
याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी.
नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी