UP Election 2022 : रायबरेलीसाठी काय आहे काँग्रेसचा मेगा प्लॅन? Special Report ABP Majha
शिशुपाल कदम, एबीपी माझा | 21 Feb 2022 10:51 PM (IST)
उत्तर प्रदेशात भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष असा सामना दिसत असतानाच प्रियंका गांधींनीही जोर लावलाय. त्यांच्या प्रचारामुळे काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी मिळणार का हे पहावं लागेल. पण यादरम्यान एका मतदारसंघाची चर्चा मात्र जोरात सुरु आहे. तो मतदारसंघ आहे रायबरेली. इथून काँग्रेसला नेहमी यश मिळालंय. लोकसभा असो की विधानसभा इथून काँग्रेसला नेहमी चांगला पाठिंबा मिळालाय. पण आता याच मतदारसंघात काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागणारय. त्यामागे काय कारण आहे? काँग्रेसचा सर्वात मोठा गड भाजप फोडणार का? रायबरेलीचा नेमका मूड काय आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी शिशुपाल कदम यांचा ग्राऊंड रिपोर्ट...