OBC Reservation इम्पेरिकल डेटाचं राजकीय महत्व, OBC आरक्षण रद्द कोणामुळे झालं? आरोप-प्रत्यारोपांना ऊत
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा | 05 Jul 2021 10:35 PM (IST)
मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा द्यावा, असा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत इम्पिरीकल डेटा केंद्राने देण्याचा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.